Published On : Tue, Apr 7th, 2020

एम.एस.ई.बी. इंजिनियर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लक्ष रुपयांची देणगी

Advertisement

नागपूर: एमएसईबी इंजिनिअर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लक्ष रुपयांचा धनादेश आज ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक तथा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही मोलाची मदत विद्युत अभियंता सोसायटीने सामाजिक जाणिवेतून दिली आहे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे डॉ.नितीन राऊत म्हणाले.

एमएसईबी इंजिनिअर्स सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल बामनोटे, उपाध्यक्ष पंकज कोलते, सचिव आशिष पहुरकर, कोषाध्यक्ष आकाश राजूरकर, संचालक सचिन महल्ले, श्रीमती निशा चौधरी यांनी धनादेश पालकमंत्र्याकडे सुपूर्द केला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.