Published On : Fri, Jan 17th, 2020

नरडाणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लखन नेतलेची बिनविरोध निवड.

नरडाणा -येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.लखन सुरेश नेतले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.श्री.नेतले यांचे बंधू श्री.गणेश नेतले यांचे अकाली निधन झाल्याने ग्रामपंचायतीतील दोन्ही गटाने ही निवडणूक बिनविरोध केली आहे.

नरडाणा ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज सकाळी घेण्यात आली,यावेळी सौ.ज्योती दिनेशराव पाटील यांनी उपसरपंच पदासाठी श्री.लखन सुरेश नेतले यांचा एकमेव अर्ज दाखल केला त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विजय साहेबराव सैंदाणे,ग्रामविकास अधिकारी यांनी माघारीचा कालावधीनंतर श्री.लखन सुरेश नेतले यांच्या एकमेव अर्ज पात्र ठरल्याने उपसरपंच पदासाठी श्री.लखन नेतले यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

नवनिर्वाचित उपसरपंच श्री. लखन नेतले यांचे बंधू कै. गणेश नेतले यांचे दि.६ जानेवारी रोजी दुर्दैवी निधन झालेले आहे.ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांसमोर उमेदवारी करणारे उमेदवार सौ. ज्योती दिनेशराव पाटील व सौ. संजीवनी संजय सिसोदे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून नेतले परिवाराला न्याय मिळवून दिला आहे.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजकारण न करता जनतेसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे,अर्थातच सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी परिवर्तन व जय पॅनलच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले.