नागपूर : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित ५७ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत नव्या प्रवीण सरोदे हिने कांस्यपदक पटकावित महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
नव्या सरोदे हिने ७ ते ९ वर्षे वयोगटातील १००० मीटर स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे या वयोगटात पदक पटकाविणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातून ती एकमेव खेळाडू आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात कार्यरत प्रवीण सरोदे यांची ती मुलगी आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय शिवाजी स्केटिंग क्लबचे टिफॉन सिन्हा, सुचित्रा दांडेकर, वडील प्रवीण सरोदे, आई मिनल सरोदे यांना दिले आहे.