Published On : Tue, May 2nd, 2017

अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत होणार वाढ

Advertisement

lpg
नवी दिल्ली :
पुन्हा एकदा सामान्यांचे बजेट गडबडणार आहे. मध्यरात्री लागू झालेल्या दोन्ही दरांनुसार अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दोन रूपयांनी वाढवण्यात आली असून विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 92 रुपयांनी कमी करण्यात आलीय.

देशाच्या वेगवेगळ्या राज्यात अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत राज्यांच्या कर आकारणीच्या आधारे 440 ते 445 रुपयांच्या दरम्यान राहिल. याआधी १ एप्रिल रोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला नव्हता. त्याआधी सलग आठ महिने अनुदानित सिलिंडरची किंमत महिना दोन रुपये वाढवण्यात येत होतीच. प्रत्येक ग्राहकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानित दरात मिळतात..त्यानंतर घ्यावी लागणारी सर्व सिलिंडर विना अनुदानित स्वरुपात घ्यावी लागतात… सिलिंडरच्या किंमतीसोबतच केरोसिच्या किंमतीतही प्रति लीटर 19 पैसे वाढ करण्यात आलीय.