Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सिलेंडरसाठी २५ दिवसांची अट रद्द… तरीही गॅस बुकिंगला अडथळा; सरकारचा निर्णय हवेतच?

The panel will be headed by retired Supreme Court Judge Ranjana Prakash Desai
Advertisement

नागपूर : एलपीजी पुरवठ्यावरील सर्व निर्बंध केंद्र सरकारने मागे घेतल्याची घोषणा करूनही एचपी गॅस ग्राहकांना सिलिंडर बुकिंगसाठी ‘२५ दिवसांचे अंतर आवश्यक’ असा संदेश अद्याप मिळत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पश्चिम आशियातील तणावामुळे लागू करण्यात आलेले ऊर्जा क्षेत्रातील निर्बंध केंद्राने हटवले असून, एलपीजीसह इतर इंधनांचा पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक एचपी गॅस ग्राहकांना सिलिंडर बुकिंग करताना २५ दिवसांचे अंतर ठेवण्याचा संदेश मिळत असल्याने सरकारच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत एचपी गॅसच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधला असता, सरकारने निर्बंध पूर्ववत केले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे २५ दिवसांच्या अटीचा संदेश अद्याप का दाखवला जात आहे, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम कायम आहे.

सरकारचा निर्णय आणि प्रत्यक्ष बुकिंग प्रणाली यामधील विसंगतीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने स्पष्टता देऊन बुकिंग प्रणाली अद्ययावत करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.