Advertisement
नांदेड : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात प्रामुख्याने भूकंपाचे जाणवले आहेत. किनवट माहुर तसेच पवना परिसरात भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले आहेत. यवतमाळमध्ये महागाव उमरेड भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.