Published On : Thu, Apr 26th, 2018

गोंदिया, पालघर लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी

election-commission211-11-1
नवी दिल्लीः गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. त्यासोबतच, पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागतेय. परंतु, सदर मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन जनतेच्या पैशांचा अपव्यव करण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी जनहित याचिका प्रमोद गुडधे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. तर भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त आहे. वनगा यांचं 30 जानेवारी 2018 रोजी निधन झालं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पलूस मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. पतंगराव कदम सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करायचे. 9 मार्च 2018 रोजी त्यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement