Published On : Fri, Jul 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या धुराळा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उडणार ; राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत

Advertisement

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात तयारी सुरु केली आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वीच संपला असून याठिकाणचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती सोपविण्यात आला आहे.

कोरोनाचे संकट त्यानंतर राज्यात सुरू झालेला सत्तासंघर्ष, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, १ जुलै २०२३ दिवशी अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार या सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. हे पाहता आयोगाने निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यासंदर्भात संकेत दिले. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होऊ शकतात, असे पत्रकात नमूद केल्याचे दिसत आहे.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement