Published On : Thu, Jan 16th, 2020

एल.एन हरदास स्मृति दिवसी समता सैनिक दलाचे पथसंचालन

कन्हान :- सुजाता बुद्ध विहार आंबेडकर नगर नाका नंबर ७ पंचकमेठी व्दारे बाबु एल एन हरदास स्मृति दिवस कार्यक्रम व कन्हान शहराच्या महामार्गाने समता सैनिक दलाने पथसंचालन केले.

जय भिम प्रवर्तक (जनक) बाबु एल एन हरदास यांचा स्मृती दिवस १२ ते १५ जानेवारी ला कन्हान नदीच्या हरदास घाटावर “हरदास मेला ” म्हणुन विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो. याच अनुसंगाने सुजाता बुद्ध विहार आंबेडकर नगर नाका नंबर ७ येथे कन्हान-पिपरीचे नगराध्यक्ष मा शंकरजी चाहांदे याच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध च्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ मनोहर पाठक यांनी बाबु एल एन हरदास यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून बुद्ध वंदना घेतल्यानंतर अल्पोहार वितरित करण्यात आला.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तद्नंतर समता सैनिक दल व्दारे नाका नंबर ७ येथुन कन्हान शहराच्या महामार्गाने कन्हान नदीच्या काठावरील हरदास मेला पर्यंत पथसंचलन करण्यात आले. डॉ आबेंड कर चौकात समता सैनिक दलाने डॉ बाबासाहेबाना पथसंचलनासह मान वंदना दिली.

कार्यक्रमाचे आयोजन सुजाता बुद्ध विहार नाका नं ७ पंचकमेटी व्दारे करून कार्यक्रमाचे संचालन संजय रंगारी यांनी तर आभार दिपंकर गजभिए यांनी व्यकत केले.कार्यक्रमास चंन्द्रशेखर भिमटे, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, अजय लोंढे, स्वाती पाठक, संगीता खोब्रागडे, राखी परते, प्रतीक्षा चवरे, सुषमा चोपकर , अनिता पाटील, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, सुनील लाडेकर, अमिश रुंघे, रिंकेश चवरे, रोहित मानवटकर, शैलेश शेळकी, ऋृषभ बावनकर, मयुर माटे, बाळु नागदेवे, दौलतजी ढोके, नितेश वासनिक, नितीन खोब्रागडे, बंडु रंगारी, धम्मा उके, सचीन बगडते, चंपा गजभि ये, मालन ढोके, परिणिती अनकर, बेबी बाई वासनिक, प्रतिमा रंगारी, अर्चना उके, राजश्री रंगारी,शालु बेलेकर, चंदा चौहान, प्रेरणा नागदेवे, व कन्हान, कामठी व नागपुर जिल्हयाचे समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक मोठया संख्येने उपस्थित राहुन बाबु एल एन हरदास स्मृती दिवसी अभिवादन केले.

Advertisement
Advertisement