Published On : Thu, Jan 16th, 2020

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा नागपूर दौरा

Advertisement

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवशीय नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. मुंबई येथून ते शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी नागपुरात मुक्कामासाठी येत असून, शनिवारी (दि. 18) सकाळी त्यांचे मुंबईकडे प्रयाण होईल.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी मुंबई येथून सायंकाळी 5.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने राजभवनकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.05 वाजता राजभवन येथे आगमन होईल, रात्री 8 वाजता ते मोटारीने सुराबर्डी येथील मिडोजकडे प्रयाण करतील. कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री राजभवन येथे मुक्काम करतील.

Advertisement
Advertisement

शनिवारी सकाळी 4.20 वाजता राजभवन येथून मोटारीने नागपूर विमानतळाकडे निघतील, 4.50 वाजता विमानतळावर आगमन व राखीव, त्यानंतर सकाळी 5.10 वाजता विमानाने मुंबईकडे त्यांचे प्रयाण होईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement