Published On : Mon, Aug 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

घरोघरी तिरंगा लावून देशभक्ती जगवा-मुख्याधिकारी संदीप बोरकर

Advertisement

कामठी :-भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वरभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मूर्ती तेवत राहाव्यात .या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञान, क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाकडून 13ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रत्येकाच्या घरावर ,कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकेल यासाठी ‘हर घर तिरंगा’हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातुन यंत्रणा कामाला लागली असून या स्वराज्य महोत्सवात कामठी शहरातील प्रत्येक नागरीकानी सहभाग नोंदवित उपरोक्त नमूद कालावधीत आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उभारावा व देशभक्ती जागृत करावी असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले .

कामठी नगर परिषद कार्यालयात आज सकाळी 11 वाजता ‘हर घर तिरंगा ‘अभियान मोठ्या उत्साहाने यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी व या महोत्सवाचे योग्य ते नियोजन करण्याच्या उद्देशाने नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यासह शिक्षक गणं यांच्या विशेष सभेत मुख्याधिकारी संदीप बोरकर बोलत होते.या विशेष सभेत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत योग्य ते नियोजन करणे, शासनाने मार्गदर्शीत केलेल्या सूचनांचे पालन करणे,शाळा रंगरंगोटी सह , विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, ध्वज संहितेचे पालन आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

Gold Rate
Monday 17 March 2025
Gold 24 KT 88,000 /-
Gold 22 KT 81,800 /-
Silver / Kg 100,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही सभा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून याप्रसंगी उपमुख्यधिकारी नितीन चव्हाण, कर अधीक्षक आबासाहेब मुंडे, विक्रम , स्वास्थ्य निरीक्षक गफ्फु मेथीयां, राहुल भोकारे, विक्रम चव्हाण, अवि चौधरी, संजय जैस्वाल यासह अब्दुल सत्तार फारुकी शाळेचे मुख्याध्यापक नकीब अख्तर यासह शालेय शिक्षक गण उपस्थित होते.

Advertisement
Advertisement