Published On : Thu, Jun 17th, 2021

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार

Advertisement

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नांदगाव (हिंगणघाट) उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न

नागपूर – वर्धा जिल्ह्यातून २० कंटेनर भाजीपाला दुबई आणि कॅनडामधे पाठविल्या गेला आहे.तसाच प्रकल्प हिंगणघाट मधे राबवून जगाच्या कानाकोपऱ्यात भाजीपाला पोहचवण्यासाठी हिंगणघाट मधून ६ डब्यांची रेल्वे सोडण्याचे नियोजन असल्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल .

हिंगणाघाट येथील पुलामुळे नागपूर हैदराबाद मार्गावरील वाहतूक जलद आणि सुरळीत होईल. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ येथील नांदगाव जंक्शन या ८६ कोटींच्या,१.४२ किमी लांबीच्या पुलाचे लोकार्पण शिवाजी मार्केट, कृ.उ.बा.स,हिंगणघाट येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपस्थित होत्या .

पुलाच्या खाली चांगले लँडस्केपिंग झालेले असून शेणापासून निर्मित नैसर्गिक पेंटचा या पुलाच्या डिस्टेंपर साठी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. नदी-नाल्यांच खोलीकरण करून रस्तेनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या कामा दरम्यान मिटविल्या गेला.वणानदीचे रिव्हरफ्रंट करून जलपर्यटनास वाव असन्याची माहिती त्यानी दिली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जिल्ह्यात हजारो कोटींची कामे झाली आहेत. त्यातील प्रत्येक तालुक्याची आणि खेड्याची रस्तेकामे, रुंदीकरण, मजबुतीकरण यांचे तपशीलवार विवेचन त्यांनी दिले. बुटीबोरी- वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा जगातील सुंदर रस्त्यापैकी एक असून या रस्त्यावर ८०,०००झाडे लावली जाणार आहेत.

हिंगणघाट मधील बाजारसमित्या,शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था यांनी वृक्षरोपणात सहभाग घ्यावा आणि ग्रीनकव्हर वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

जाम जंक्शनवर रोटरी तयार करण्याचे डिझाईन उपलब्ध करून देण्याचे तसेच तेथील बायपास साठी घरे उध्वस्त करण्याची गरज नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

केंद्रीय मार्ग निधीतील ९ पैकी ५ कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगती पथावर आहेत.

रेमेडेसिविर उत्पादनामुळे वर्धा जिल्हा जगात प्रसिद्ध झाला आहे तसेच काळ्या बुरशीच्या आजारासाठी सुद्धा इंजेक्शन निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ऑक्सीजन प्लँटची झालेली निर्मिती हे करोनाच्या पुढील लाटी थोपविण्यास सक्षम असल्याची खात्री त्यांनी दर्शविली.

वर्धा आर्वी येथील रस्त्याचे ३१५कोटींचे, आर्वी शहर बायपास साठी २२ कोटी, नांदगावच्या ६८ कोटींच्या उड्डाणपुलाचे,तसेच वणा नदीवरील ४५ कोटींचे बांधकाम आणि आर्वी शहरातील बायपास साठी २२ कोटी रुपयांचे जमीनहस्तांतरण,आणि विविध रस्त्यांची कामे पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले.वडनेर-अजनसरा येथील २४ कोटींचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू अशी खात्री दिली. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अनुदानातून लोकोपयोगी कामे होतील अशी यंत्रणा गावोगावी पोहेचणार याची व्यवस्था केली जाणार.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज जगात लाखो लोकांजवळ आपण पोहचू शकतो. परंतु हिंगणघाटवासियांच मनोबल वाढविण्यासाठी आज कार्यक्रमाला हजेरी लावली.

दरम्यानच्या काळात सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोना लस घ्यावी असे जाहीर आवाहन त्यांनी शेवटी केले.