Published On : Fri, Aug 2nd, 2019

टाटा इतवारी पॅसेंजर मधून 11 किलो अवैध गांजा जप्त

कामठी :- स्थानिक रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गाहुन नागपूर कडे जात असलेले रेल्वे गाडी क्र 58111 टाटा इतवारी पॅसेंजर च्या जनरल कोच मधून अवैधरित्या गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर टाटा इतवारी पॅसेंजर कामठी रेल्वेस्थानकावर येताच पोलिसांनी या रेल्वेगाडीत चढून तपासणी केली असता तपासणीदारम्यान रेल्वे गाडी कळमना रेल्वे मार्गावर पोहोचेपर्यंत पोलिसांना एक बेवारस बॅग आढळुन आली

या बॅग चा कुणीही वाली नसल्याचे लक्षात येताच सदर बॅग ताब्यात घेऊन कळमना रेल्वे स्टेशन प्लेटफॉर्म क्र 1 वर खाली उतरून बॅग ची तपासणी केली असता बॅग मध्ये वेगवेगळ्या साईज चे 5 पॅकेट मजबुती ने बांधून दिसले यावर अधिक तपासणी केली असता यामध्ये 11 किलो गांजा जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही रेल्वे सुरक्षा दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर चे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय, सहाययक सुरक्षा आयुक्त के स्वामी, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मो मुगिसुद्दीन, पोलीस उपनीरीक्षक बी लेंबो, प्रधान आयुक्त प्रकाश रायसेडाम, सतीश इंगळे, इशांत दीक्षित, प्रवेश कुमार मिश्रा आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी