Published On : Wed, Jun 6th, 2018

पोलीसांनी जनावरांची दोन ट्रक पकडुन ७५ जनावरांना दिले जीवनदान

Advertisement

कन्हान : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ नागपूर शहर बॉयपास वरील कांद्री (बोरडा) टोल नाक्यावर जनावरांचे दोन ट्रकला थांबविले असताना कट मारून दोन्ही ट्रक पळाले असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून विहीरगाव, नागपूर च्या जवळ पकडून कन्हान पोलीस ठाण्यात आणुन कार्यवाही करून ७५ जनावरांना जिवनदान दिले . व ४३ लाख २४हजार २०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर ग्रामीण पोलीस विशेष पथकास मध्य प्रदेशातुन जनावरांची दोन ट्रक भरून येत असल्याचे गुप्त माहीती मिळाल्या वरून नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ नागपूर शहर बॉयपास वरील कांद्री (बोरडा) टोलनाक्यावर आज (दि. ६)जुन ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान जनावरांचे दोन ट्रकला थांबविले असताना कट मारून दोन्ही ट्रक पळाले असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून विहीरगाव, नागपूर च्या जवळ दाहा चाकी ट्रक क्र. ए पी १२ – यु – ९१६५ मध्ये ३० जनावरे , व दुसरा ट्रक क्र. टी एस १२- यु बी – ८१८५ मध्ये ५० जनावरे निर्दयपणे गच्च भरून अवैधरीत्या नेत असताना पकडून दोन्ही ट्रकला कन्हान पोलीस ठाण्यात आणुन ट्रक चालक शेख इब्राहीम शेख हारून य़शोदा नगर नागपूर व ट्रक चालक अकरम खान ताज नगर, मानकापुर नागपूर या दोघांना अटक करून त्याच्या जवळुन ८० जनावरे किमत ०८ लाख रुपये , पहिला ट्रक २० लाख रुपये , दुसऱा ट्रक १५ लाख रुपये , मोबाईल व नगदी २४हजार २०० रूपये असा एकूण ४३ लाख २४हजार २०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

यात आरोपी ट्रक चालक १) शेख इब्राहीम शेख हारून य़शोदा नगर नागपूर २) ट्रक चालक अकरम खान ताज नगर, मानकापुर नागपूर, ३) ट्रक मालक फजल हसन गोंविद वॉईन शॉप टेका नांका नागपूर, ४) ट्रक मालक शकील शेख चांभार नाला , पाचपावली नागपूर या चौघांन विरूध्द कलम ४२९ , १३२, १७७ भादंवि व १८४ मोटार व्हीकल अँक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे . ग्रामीण पोलीस विशेष पथक व कन्हान पोलीसांनी कार्यवाही करून ७५ जनावरांना जिवनदान दिले.

तर ट्रकच्या आत गुदमरून पाच जनावरांचा मुत्यु झाला .ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , सहायक पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, धवड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर ग्रामीण पोलीस विशेष पथकाचे शांताराम मृंदमाळी , महेंद्र सरपटे, श्रीकांत पांढरे, अमित मेहरे, कार्तिक पुरी , चंद्रशेखर शेंदरे व कन्हान ठाणेदार चंद्रकांत काळे , संजय भदोरिया, प्रकाश वर्मा आदीने विशेष कार्य करून ७५ जनावरांना जिवनदान देऊन ही जनावरे गौरक्षण ला रवाना केली .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement