Advertisement
नागपुर: अंबाझरी येथील क्रेझी कॅसल येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेची संपूर्ण शहनिशा करून जो दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. क्रेझी कॅसलची लीज संपली आहे. त्यांना जागा सोडण्याची नोटीस बजाविण्यात असून त्यांनी जागा रिकामी केली नाही, क्रेझी कॅसलवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.