नागपूर : खापरखेडा कोराडी येथील ट्रॅकवर रेल्वेगाडीने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत बिबट्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची माहिती आहे. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतला. शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
जंगलानजीक असणाऱ्या रेल्वे ट्रॅकखाली येऊन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.
त्यात अन्य वन्य प्राण्यांबरोबरच वाघ, बिबटच्याही समावेश आहे. त्यासाठी पुन्हा एकदा वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज प्रतिपादित होत आहे.
Advertisement









