नागपूर: आदिपुरुष’ चित्रपटावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले तरी वाद मिटत नसल्याचे चित्र आहे. काहींनी चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेतला.तर काहींनी चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. मात्र आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना आक्षेपार्ह संवाद आणि वादग्रस्त दृश्यांसाठी चित्रपट निर्मात्याला नोटीस पाठवली आहे.
सेन्सॉर बोर्डाला सुनावले खडेबोल –
27 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चांगलंच फटकारले आणि CBFC म्हणजेच सेन्सॉर बोर्डाच्या वतीने सुनावणीस हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना विचारले की, आक्षेपार्ह दृश्ये, कपडे आणि दृश्यांबद्दल काय केले जात आहे? या धर्माचे लोक खूप सहिष्णू आहेत असे म्हणून आम्हीही डोळे मिटवून घ्यायचे का? ते सहिष्णू आहेत, त्यांच्या सहिष्णूतेची कसोटी घ्यायची का? ही सहनशक्तीची परीक्षा आहे का? ही कोणत्याही प्रोपेगेंडाअंतर्गत केलेली याचिका नाही.
आदिपुरुष टीमला नोटीस बजावली
आदिपुरुष चित्रपटातील माँ सीता, हनुमान आणि इतर पौराणिक पात्रांचे चित्रण आक्षेपार्ह असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने म्हटले आहे. या कारणास्तव चित्रपट निर्माते, संवाद लेखक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोर सीबीएफसीला म्हणजे सेन्सॉर बोर्डाला अशी विचारणा केली आहे की, चित्रपटाला रिलीजची परवानगी देण्यापूर्वी काय पावले उचलली गेली होती.
26 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सांगितले होते की, केवळ रामायणच नाही तर पवित्र कुराण, गुरु ग्रंथ साहिब आणि गीता यांसारखे इतर धार्मिक ग्रंथ तर सोडा. बाकीचे जे काही करत आहात ते करत रहा. चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि इतर प्रतिवादी पक्ष न्यायालयात उपस्थित नसल्याबद्दलही न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी सेन्सॉर बोर्डाने अद्याप उत्तर दाखल न केल्याबद्दल आक्षेप घेतला आणि चित्रपटातील आक्षेपार्ह तथ्यांबद्दल न्यायालयाला अवगत केले.
निर्मात्यांनी आपले विधान बदलले
आदिपुरुषमध्ये प्रभासने प्रभू रामाची, तर क्रिती सेनॉनने जानकीची तर सैफ अली खानने लंकेशची भूमिका केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी दावा केला होता की ही रामायणाची कथा आहे, जी ते एका नवीन पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करणार आहेत. मात्र, रिलीजनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांनी आपले विधान बदलले आणि आम्ही रामायण नव्हे तर रामायणावर आधारित चित्रपट बनवला असल्याचे सांगितले.डायलॉगवर लोकांचा वाढता आक्षेप पाहता निर्मात्यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह संवादही बदलले होते. पण त्यानंतरही ते अडचणीत सापडले आहे.