नागपूर :नागपूर महानगर पालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या वंजारी नगर जलकुंभ ( नेहरू नगर झोन) आणि जयंताळा जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन) ह्यांचे आंतरजोडणी करिता येत्या ३० जून (शुक्रवारी) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे . नवीन वंजारी नगर जलकुंभ (९००x ५०० व्यासाच्या) जलवाहिनी आंतरजोडणी करिता १२ तासांचा (सकाळी १० ते रात्री १० ) तसेच जयताळा जलकुंभ ५००x ५०० व्यासाच्या आंतरजोडणी करिता २४ तासांचा (जून ३० सकाळी १० ते जुलै १ सकाळी १० ) चा तांत्रिक शटडाऊन अपेक्षित आहे .
ह्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
नेहरू नगर झोन : नवीन वंजारी नगर जलकुंभ जलवाहिनी आंतरजोडणी करिता १२ तासांचा शटडाऊन (सकाळी १० ते रात्री १० )
सक्करदरा १ आणि २ जलकुंभ: महालक्ष्मी नगर,-१, २ आणि ३ , लादीकर ले आउट, चक्रधर नगर, बँक कॉलोनी, जवाहर नगर, भांडे प्लॉट, सेवादल नगर गवांदीपूर, सोळंकी वाडी
सक्करदरा ३ जलकुंभ: राजीव गांधी नगर, नव सुभेदार ले आउट, बीडीपीठ, आशीर्वाद नगर, ताज अम्मा कॉलोनी, बँक कॉलोनी, इंदिरा गांधी सभागृह चा भाग , आशीर्वाद नगर, गुरुदेव नगर, रुक्मिणी नगर , संजय गांधी नगर आणि श्री राम नगर.
लक्ष्मी नगर झोन : जयताळा जलकुंभ आंतरजोडणी करिता २४ तासांचा (जून ३० सकाळी १० ते जुलै १ सकाळी १० ) चा शटडाऊन
जयताळा जलकुंभ : रमाबाई आंबेडकर नगर , जुना जयंताला , एकात्मता नगर, दादाजी नगर, पूजा ले आऊट , पाखिरे ले आउट, ठाकरे ले आउट, भांगे ले आउट, नितनवरे ले आउट, वूड लँड सोसायटी, दाते ले आउट, साई ले आउट, सत्य साई बाबा नगर, शारदा नगर, वडस्कर ले आउट , मालपुरे ले आउट , झाडे ले आउट , शिव विहार , फोर्थ इंडिया ले आउट, तुलसी विहार , ससाणे ले आउट, डंभारे ले आउट, कबीर नगर, पंचवटी नगर, महाजन ले आउट, संघर्ष नगर आणि स्वस्तिक नगर व इतर परिसर
मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .