Published On : Sat, Dec 15th, 2018

इंधन बचत मोहिमेचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Advertisement

विदर्भातील सर्व जिल्ह्यात करणार मोहिमेचा प्रचार व प्रसार

नागपूर : पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पेट्रालियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय, भारत सरकार) यांच्यावतीने सुरू इंधन बचतीकरीता सुरू करण्यात आलेल्या इंधन बचत मोहिमेचा शुक्रवारी (ता. १४) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मनपा मुख्यालयाबाहेर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर व परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांनी इंधन बचत रथाला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी परिवहन समिती सदस्या अभिरूची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघचे अतिरिक्त निदेशक जाडी नारायणा, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, सुनील शुक्ला, प्रभव बोकारे, किशोर भन्नेरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पेट्रालियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय, भारत सरकार) यांच्यावतीने १४ डिसेंबर २०१८ ते १३ जानेवारी २०१९ इंधन बचत मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये ‘इंधन बचत रथ’ विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये इंधन बचतीचा प्रचार व प्रसार करणार आहेत.

जैविक इंधन खपावर निर्बंध आणण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीकरिता मनपा परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्या पुढाकाराने ही मोहिम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मधून नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस पेट्रोल, डिझेलचा वापर न करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या निर्देशानुसार इंधन बचतीची व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे.

यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांनी शहरबस वाहतुकीत इंधन बचतीकरीता शहरबसचे चालक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले.