नागपूर: नवीन सुभेदार लेआऊट, ठवरे कॉलनी येथे ठवरे को-ऑप. हाऊसिंग सोसायटीतर्फे संचालीत ‘अभ्यासिकेचा’ उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम करताना होतकरू विद्यार्थ्यांसाठी सदर अभ्यासिका मैलाचा दगड ठरावी या उद्देशाने अभ्यासिकेचे निर्माण करण्यात आलेले आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन नागपूर पोलिस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, नगरसेवक नागेश सहारे, नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम मांडस्कर, जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. नितीन देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी नीलेश भरणे यांनी संस्थेच्या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अॅड. रोशन बागडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.
सदर अभ्यासिकेच्या निर्माणास दी. ठवरे को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या विविध सभासदांनी मुक्त हस्ते दान देऊन निर्माणकार्य पूर्णत्वास नेले. अशा समस्त सभासदांचा उद्घाटक तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतकेरिता संस्थेचे सचिव सुभाष लांजेवार, कोषाध्यक्ष हितेंद्र मुन, चंद्रशेखर वासनिक, मोरेश्वर बागडे, प्रशांत भोतमांगे व इतर सभासदांनी महत्त्वाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. वैभव दहिवले यांनी तर आभार अजय कांबळे यांनी मानले.
