Published On : Wed, Jul 24th, 2019

दिवानी न्यायालय रामटेक परीसरात केली वृक्षलागवड.

“पर्यावरणाच्या संतुलनाकरिता वृक्ष लागवडीसह वृक्षसंगोपन करणे काळाची गरज”- न्यायाधीश माणिक वाघ यांचे प्रतिपादन

रामटेक: वृक्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे . पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यात व्रुक्षाची प्रमुख भूमिका असते, हे सत्य जोपर्यंत मानवाच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत मानव सुखी होऊ शकणार नाही.म्हणूनच पर्यावरणाच्या संतुलना करीता वृक्ष लावण्यासोबतच ते जगविण्याची सुद्धा तळमळ अंगी बाळगावी .पुढे बोलतांना दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ म्हणाले की ” कार्यालयीन कामकाजाची सुरुवात झाडांना पाणी टाकून होईल , तर कामकाजाची वेळ संपल्यानंतर झाडाला पाणी टाकूनच कार्यालय सोडावे “असा मोलाचा सल्ला हयाप्रसंगी दिला हे विशेष .

150 व्या गांधी जयंती अभियान अंतर्गत दिवाणी न्यायालय रामटेक परीसरात नुकतेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांचे अध्यक्षतेखाली व सह दिवाणी न्यायाधीश व्ही .पी .धुर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पार पडला . सदर कार्यक्रम तालुका विधी सेवा समिती व सामाजिक वनीकरण विभाग रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या 30 वृक्षांचे रोपण करण्यात आले . सदर वृक्षारोपण कार्यक्रमात सहदिवाणी न्यायाधीश व्ही .पी .धुर्वे यांनी “वृक्षारोपणाचे महत्व सांगून पर्यावरणाबद्दल माहिती देऊन वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी आपली सर्वाची असून , नुसते वृक्ष लावून होणार नाही तर त्याचे संगोपन करणेसुद्धा गरजेचे आहे,”असे प्रतिपादन केले .

या कार्यक्रमाला सामाजिक वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी दीपा नाननवरे ,आर.एफ.ओ. कानतेश्वर बोलके , वन परिक्षेत्र अधिकारी सतीश गाडिंगे यांनी मोलाचे सहकार्य केले . राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड . एम .एन .नवरे , तालुका वकील संघाचे सचिव अँड. एम. व्ही. येरपुडे ,अँड ए .व्ही .गजभिये ,अँड पी बी बांते, ,अँड अरुण महाजन , अँड .कुंती गडे ,अँड .स्वाती वहाने ,अँड .अंतकला पंदरे, यांनी मोठया उत्साहात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग दर्शविला .

वृक्ष रोपण कार्यकम प्रसंगी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक ए. एन . रेवतकर,डी .जी .पोकळे,लघुलेखक वरिष्ठ लिपिक एस. एच. तालेवार,एम. एल. शेळके, वरिष्ठ लिपिक मोहन पिंजरकर , छाया खापरे ,कनिष्ठ लिपिक व्ही. एम. बाजारे,एच .के .खडसे, आकाश येरपुडे ,अभिलाषा यादव , व्ही. एम .मुळे,शिपाई महेश सूरपाम यांनी वृक्ष लागवड करून संगोपनाचा संकल्प केला .न्यायालयीन कर्मचारीगण यांनी हिरीरीने भाग घेऊन विविध प्रकारच्या वृक्षाचे रोपण करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला .