Published On : Tue, Aug 27th, 2019

लता दीदीमुळे गाणे शिकलो – कैलाश तानकर प्रेरणादायी गीतांनी रंगला कार्यक्रम

Advertisement

नागपुर: ‘पोलिस म्हणून कार्य करायला सुरुवात केल्यानंतर मुंबईला गानकोकिळा लता दीदीसोबत पोस्टींग मिळाली. खूप आनंद झाला. आपल्याला देवच मिळाला असे वाटले. तेव्हापासून गाणे शिकायला सुरुवात केली. तेव्हाच कल्पना आली की, असा कार्यक्रम करावा ज्यातून लोक काहीतरी प्रेरणादायी घेऊन जातील आणि मोटीव्हेशन स्पीकर आणि सिंगर झालो, असे म्हणत पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी अनेक प्रेरणादायी गीते सादर केली.

युवापिढीसाठी प्रेरणादायी असे वक्ते आणि गायक पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांचा संगीतमय कार्यक्रम सोमवारी मधुरम हॉलमध्ये घेण्यात आला. मोटीव्हेशनल स्पीकर पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांचे प्रेरणादायी भाषण आणि प्रेरक अशा गीतांचा हा कार्यक्रम होता.

Advertisement
Advertisement

डॉ. ममता व सोनल सुडोकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिंदगी का सफर या गीताच्या सुरावटीसोबत कैलाश तानकर यांची मंचावर प्रवेश केला. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा, असे सांगत त्यांनी आपण या जगात सुखमय, शांतीपूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आलो आहोत. ये उसी की लिला है जिसका रंग निला है असे म्हणत त्यांनी निले गगन के तले हे गीत सादर केले. त्यानंतर सावन का महिना, वी विल रॉक यू, पग घुंगरू, कोरा कागज था, सैया दिलमें आना रे अशी एकाहून एक सुंदर गीते कैलाश तानकर व इतर गायकांनी सादर केली.

सुपर सिंगर्स सोनी टीव्ही स्टार श्रावणी या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. डॉ. ममता, अमरनाथ, सतीश, सायोनी, दीपाली, अनूप, कामिनी, माधुरी, स्वामीनाथन, सोनल, मुकेश, सागर, जयश्री, यश, बोबिता व श्रेया यांचा कार्यक्रमात सहभाग होता. जय जय शिवशंकर या गीताने कार्यक्रमाचा शानदार समारोप झाला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement