नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत सामाजिक सुरक्षा पथकाने गांजाच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. भिमरत्न नगर, डोबी मोतीबाग झोपडपट्टी परिसरात छापा टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ९ किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १ लाख ४५ हजार ७४० रुपये इतकी आहे.
ही कारवाई दि. ९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.४० ते रात्री ९.२० दरम्यान करण्यात आली. गुप्त बातमीदाराच्या माहितीनंतर सामाजिक सुरक्षा पथकाने पंचा समक्ष छापा टाकून ही कारवाई केली. नूर मोहम्मद गफूर कुरेशी (वय ३९) रा. भिमरत्न नगर, डोबी मोतीबाग झोपडपट्टी, नागपूर, अभिषेक सुरेश दहिया (वय २४) सध्या मुक्काम कपिल नगर चौक, अपना हॉटेल, नागपूर, मूळ राहणार सतना, मध्य प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल :
९ किलो १३८ ग्रॅम गांजा – अंदाजे किंमत १,३७,०७० रुपये
रोख रक्कम – ३,६७० रुपये
मोबाईल फोन (आयटेल कंपनीचा) – किंमत सुमारे ५,००० रुपये
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – १,४५,७४० रुपये
या प्रकरणात इर्शाद उर्फ इच्छु पीर खान (वय ३०, रा. डोबी, दम्मदार दर्गा जवळ) हा आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिhhक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी केली. NDPS कायद्यानुसार 549/2025 अंतर्गत कलम 8(क), 20(ब), 2(ब), 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रवाहाला आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.