Published On : Fri, Oct 5th, 2018

कांबळे दुहेरी हत्याकांड: गुड़िया शाहु चा जामीन चौथ्यानदा नामंजुर

Advertisement

नागपुर : माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9) यांच्या न्यायालयात दिनांक 17 /9/2018 रोजी तातपुरता जामीनावर सोडण्याकरिता अर्ज लावलेला होता ,आरोपी गुड़िया शाहु हिने जामीन अर्जात असे नमुद केले होते की ती 8 महिन्याची गर्भवती आहे व तीला उपचारा करिता व डिलीवरी करीता तातपुरता जामीनावर सोडण्यात यावे, अर्ज़ात आरोपी गुड़िया शाहु ने असे नमुद केले होते की जेल कारागृहात उपोरोक्त वेवस्था नसल्याने तिला उचित वैधकिय सवलत प्राप्त होत नाही आहे ,

माननीय न्यायालयाने जेल प्रशासनाला नोटिस बजावुन आरोपी गुड़िया शाहु ची प्रकृति तसेच जेलद्वारे डिलीवरी करिता असलेली सोय बाबत जवाब मागितला होता , आज दिनांक 5 /10/2018 रोजी सरकार तर्फे उत्तर दाखिल करण्यात आले व असे सांगण्यात आले की दिनांक 30/9/2018 रोजी आरोपी गुड़िया शाहु ला गवरमेंट मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले व तीला दिनांक 1/10/2018 रोजी सकाळी 6 वाजुन 45 मिनिटानी नॉर्मल डिलीवरी द्वारे बाळ जन्माला आलेले आहे, शासनाच्या उत्तरात असेही नमुद आहे की आरोपी गुड़िया शाहु हिची प्रकृति बघण्याकरिता जेल प्रशासनाकडे उपोरोक्त वेवस्था आहे व तसेच अल्पोहाराची सुद्धा चांगली सुविधा आहे, माननीय न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन आदेश पारित केला व त्यात असे नमुद केले की आरोपी गुड़िया शाहु हिच्यावर फिर्यादि रविकांत कांबळे यांची आई व त्यांची दीढ़ वर्षाच्या मुलीचा हत्येचा आरोप असुन प्रकरण अतिशय गंभीर आहे , मा. न्यायालयाने आदेशात असे नमुद केलेले आहे की आरोपी गुड़िया शाहु ही गर्भवती आहे हा मुद्दा तिच्या अगोदरच्या जामीन अर्ज़ात नमुद होता व त्याला ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने व तसेच माननिय उच्च न्यायालयाने आरोपी गुड़िया शाहु चा जामीन अर्ज रद्द केला होता ,

सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तिवाद केला की, नागपूर कारागृहात लहान बाळांच्या संगोपनाची पूर्ण काळजी घेतली जाते, व बाळंतीन महिलांना सुद्धा पूर्ण सुविधांची पूर्तता केली जाते,हा युक्तिवाद ग्राह्य धरला, वरील सगळ्या बाबी आदेशात नमुद करुण न्यायाधीश ए. एस.काझी साहेब यांनी आज दिनांक 5/10/2018 रोजी आरोपी गुड़िया शाहु चा जामीन अर्ज रद्द केला.

सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तिवाद केला फिर्यादि तर्फे अधिवक्ता समीर सोनवणे व आरोपी च्या वतीने देवेंद्र चव्हाण यांचे सहकारी चेतन बर्वे यांनी बाजु मांडली .