नागपूर: महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. महायुतीच्या यशात या योजनेचाही मोठा वाटा आहे. आता निवडणुका पार पडल्यावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचं उत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. आमदार लवकरच आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतील. काही चिंतेचे कारण नाहीये. सराकर आलं काम करत आहेत. चांगले निर्णय होत आहेत. लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा येत्या दोन – तीन दिवसांत मिळणार आहे. कुठेही काहीही अडचण नाही,असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.









