मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिला चिंतेत होत्या. पण आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यात तब्बल ₹३००० रुपये जमा होऊ शकतात.
सामान्यपणे हप्ता उशिरा मिळाल्यास पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषणा केली जाते. मात्र अजून ऑगस्टबाबत काहीही जाहीर झालेले नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत मंत्री आदिती तटकरे याबाबत निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन उत्पन्न, वाहनधारकत्व आदींची तपासणी करत आहेत. निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होत असून आतापर्यंत तब्बल २६ लाख अर्ज रद्द झाले आहेत. पुढे ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा हप्ता जमा झाल्यास मोठा दिलासा मिळणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.