Published On : Fri, Sep 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘लाडकी बहीण’ योजनेत महत्वाचा निर्णय; लाभार्थ्यांनी २ महिन्यांत e-KYC करणे अनिवार्य

मुंबई: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन आदेश जारी केला आहे. आता या योजनेतील सर्व पात्र महिलांनी २ महिन्यांच्या आत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक आहे.

योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या परिपत्रकानुसार, आधार प्रमाणीकरण करूनच योजनेचा लाभ घेता येईल. या पद्धतीमुळे लाभार्थ्यांची माहिती सुरक्षित राहील आणि योजना अधिक पारदर्शक होईल.

मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सशक्तीकरण देणे तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यास मदत करणे आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट आर्थिक मदत दिली जाते.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शासनाच्या या नवीन निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात ई-केवायसी न केल्यास त्या लाभार्थ्या पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील. तसेच भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहील. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया सोपी असून भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल.

Advertisement
Advertisement