Published On : Mon, Mar 15th, 2021

एल.ए.डी. चौक मेट्रो स्टेशन युथ थीम वर

– मेट्रो स्टेशन,आकर्षक कलाकृतीचा नमुना

नागपूर– नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत अनेक मेट्रो स्टेशन व मेट्रो पिलर वर आकर्षक कलाकृती महा मेट्रोच्या वतीने करण्यात आली असून, कलाकृती करतांना त्या स्टेशनची थीम व त्या परिसराचा भौगौलिक दृष्टिकोन लक्षात घेऊन त्या ठिकाणी योग्य अश्या कलाकृती महा मेट्रोच्या वतीने तयार करण्यात येत आहे या मध्ये आणखी एका मेट्रो स्टेशन वर भर घालत एल.ए.डी. चौक मेट्रो स्टेशन युथ थीम वर साकारण्यात आले आहे.

ऍक्वा लाईन मार्गिकेवरील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व तरुणांचा वावर तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, कॉलेज व मार्केट परिसर, हॉटेल असल्यामुळे या या परिसरात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बघायला मिळतो याच अनुषंगाने महा मेट्रोने एल.ए.डी. चौक मेट्रो स्टेशन युथ थीम वर साकारले आहे.

सदर मेट्रो स्टेशनच्या एका भिंतीवर तरुण मुलं मुलींचे म्युरल, मेट्रो पिलर वर तरुणाचे चेहरे, बॅडमिंटन,गोल्फ,फुटबॉल,व्हॉलीबॉल, कराटे, जिमन्यास्टिक सादर करत असलेले म्युरल तसेच रॉक बँड व ढोलचे आकर्षक असे म्युरल तयार करण्यात आले आहे.

महा मेट्रोने नेहमीच विद्यार्थी,तरुणांकडे लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्ती तरुणांना मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडले आहे. एल.ए.डी. चौक मेट्रो स्टेशन येथे तयार करण्यात आलेल्या कलाकृती तरुणांना ध्यानात ठेवून तयार करण्यात आले.

महा मेट्रोने या पूर्वी देखील अनेक मेट्रो स्टेशन व मेट्रो पिलर उत्कृष्ट कलाकृती साकारल्या आहेत ज्यामध्ये ऑरेंज लाईन मार्गिकेवर छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय झासी राणी चौक मेट्रो स्टेशन येथे देखील राणी लक्ष्मीबाई यांचे म्युरल, रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथे तयार करण्यात आलेले आकर्षक फॉरेस्ट म्युरल, रहाटे कॉलोनी मेट्रो स्थानकाजवळ `बेटीबचाव, बेटी पढाव’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती, ऍक्वा लाईन मार्गिकेवर सुभाष नगर मेट्रो स्टेशन स्वामी विवेकानंद स्मारक समोर मेट्रो पिलर वर प्लेमिंगो पक्ष्याचे म्युरलचा समावेश आहे.

उल्लेखनीय आहे कि आता पर्यंत तयार करण्यात आलेल्या कलाकृती या स्थानिक कलाकारांनी तयार केल्या आहे.