Published On : Thu, May 13th, 2021

हिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन

रामटेक – तालुक्यातील मा. बाळासाहेब मस्के, तहसीलदार रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरा हिवरी गावात घरोघरी जाऊन कोविड-१९ लसीकरणबाबत समुपदेशन व जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी नायब तहसीलदार मनोज वाडे,तलाठी चंदन बावणे, ग्रामसेवक पवार, सरपंच सुरेखा मलेवार, उपसरपंच विष्णू काठोके,मुख्याध्यापक सचिन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रामाजी जांभूळे, बेबी कुंभलकर, माधव मलेवार ,नंदा नेवारे ,पोलिस पाटील रमेश नाटकर,कोतवाल वसंता गणविर,ग्रामपंचायत कर्मचारी नंदू चव्हाण, करण बिरणवार व इतर नागरिक उपस्थित होते.कोविड १९ लसीकरणाबाबत नागरिकांचे समुपदेशन व जनजागृती करण्यात आले.