Published On : Fri, May 14th, 2021

एका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत पालीउमरी हदीतिल गांव घुकसी येथील एका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले. ममता नारायण नारनवरे वय ३० वर्षे असे म्रुतक महिलेचे नाव असून पारशिवनी पाली अमरी ग्राम पंचायत हद्दीतील घुकसी गावातील ही घटना ११ मे मंगलवारी रोजी घडली.मिळालेल्या माहितीनुसार हकिकत अशी आहे की, मृतकाचे घरी गायी, बैल व गोरे असे शेतीपयोगी पाळीव प्राणी आहेत.

११ मे मंगलवारी रोजी सायंकाळी ६- १५ वाजता सर्व गुरे जगलातुन चराई करून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायी व गुरे खुट्याला बांधण्यासाठी ममता गेली असता ती गायीला खुट्याला बांधत होती.तेवढ्यात मोकाट असलेला बैल (गोरा) एकाएकी क्रोधीत होवून ममता ला सिंगावर उचलून दूर फेकले. त्यामुळे ममताच्या डोक्याला गंभीरपणे दुखापत झाली. तेव्हा तीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते व उपचार करुन रात्री घरी आणले.

तेव्हा भोजन प्रक्रिया व अन्य हलचली नियंत्रित दिसून येत होत्या.१२ मे बुधवारी रोजी सकाळी जेवण केले.नंतर ममता ला त्रास सुरुच असल्याने ममताला पुन्हा दवाखान्यात नेण्याची तयारी केली मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात सकाळी १०-३० वाजता दरम्यान ममताने प्राण सोडला असल्याचे कौटुंबिकांना निदर्शनास आले. त्यामुळे प्रेत घरी परत आणले व घुकसी गावी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीच्या म्रुत्यु पश्चात पती,मुलगी व मुलगा असा आप्त परिवार आहे. ममताच्या म्रुत्यूने परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून तीच्या परिवाराला शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी म्रुतकाचे नातेवाईक व ग्राम पंचायत पाली उमरी हदीतील सरपंच ,उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य ,ब घुकसी गावातील नागरिकांची मागणी आहे.ममता च्या परिवाराला शासकीय आर्थिक मदत मिळावी.