Published On : Fri, Oct 5th, 2018

अखंड मनोकामना महाज्योत प्रज्वलन सुविधा

Advertisement

Koradi Mandir

नागपूर: अश्विन शुध्द प्रतिपदा ते नवमी हा आदिशक्तीच्या उपासनेचा काळ, अश्विन नवरात्र उत्सव दिनांक 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान कोराडी येथील आई जगदंबेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मंदिर व्यवस्थापनातर्फे नवरात्रोत्सवाची सज्जता झाली असून यावर्षीपासून भाविकांसाठी अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्याची सुविधा मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरु करण्यात येत आहे. या निर्णयांतर्गत आता एकच ज्योत महाज्योत आई जगदंबेच्या मूर्तीसमोर प्रज्वलित करण्यात येईल. ही अखंड ज्योत वर्षभर म्हणजे 365 दिवस तेवत राहणार आहे.
जगदंबेच्या मूर्तीसमोर आपल्या किंवा आपल्या परिचितांच्या, नातेवाईकांच्या नावाने वर्षभर अखंड ज्योत प्रज्वलित करू शकता. यासाठी एक वर्षाला 2100 रुपये, 5 वर्षांकरिता 11 हजार रुपये, 11 वर्षांकरिता 21 हजार रुपये, 21 वर्षांकरिता 51 हजार रुपये, 31 वर्षांकरिता 1 लाख रुपये, 51 वर्षांकरिता 2 लाख रुपये आणि आजीवन अखंड महाज्योत प्रज्वलन करण्याकरिता 2 लाख 50 हजार रुपये एवढी सहयोग राशी आपण जमा करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी भाविक कोराडी मंदिर परिसरातील कार्यालयाशी मोबाईल 9607979222, 9607979555 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

कोराडी मंदिराची आजवरची परंपरा आहे की, चैत्र आणि अश्विन नवरात्र उत्सवादरम्यान मंदिर व्यवस्थापनातर्फे भक्तांसाठी महाज्योत प्रज्वलनाची सुविधा उपलब्ध करू दिली जायची. या प्रक्रियेमुळे लाखो ज्योत प्रज्वलित करताना मंदिर व्यवस्थापनासमोर काही समस्या उभ्या राहात होत्या. त्याचबरोबर शेकडो लिटर तेल जाळल्यामुळे मंदिर परिसरात उष्णता वाढून प्रदूषणाची समस्याही निर्माण होत होती. या समस्या सोडविण्यासाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे हा अद्वितीय आणि व्यापक उपाय यंदा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्योत प्रज्वलन ही भक्तांच्या मनातील भावना आहे. म्हणूनच एका दिव्य ज्योतीतून दुसरी दिव्य ज्योत जोडून या महाज्योतीच्या रुपाने आई जगदंबेच्या चरणी एक पवित्र भावना अर्पण करण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा मानस आहे. या निर्णयाचा भाविक नक्कीच स्वीकार करतील असा विश्वास मंदिर व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Today’s Rate
Wednesday 09 Oct. 2024
Gold 24 KT 75,200 /-
Gold 22 KT 69,900 /-
Silver / Kg 89,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement