कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर येणार : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर घेणार असून येथे वीज बिल येणार नाही. तसेच सौर ऊर्जेवरील बस चार्जिंग स्टेशनही येथे उभारले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

कोराडी जगदंबा देवी शहर बस आगाराचे उद्घाटन आज पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी परिवहन सभापती बंटी कुकडे, महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडी सरपंच सुनीता चिंचुरकर, संजय जयस्वाल, सीमा जयस्वाल, राम तोडवाल, उमेश निमोने, बेबीताई खुबिले, कल्पनाताई कामटकर, नरेंद्र धनोले, देवा सावरकर, एमएमआरडीएचे लीना उपाध्याय, प्रशांत पाग्रुत, महानिर्मितीचे मुख्य अभियंता तासकर आदी उपस्थित होते. या आगारासाठी एनएमआरडीए 10.96 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यात बस स्टेशन, आवार भिंत, वाहनतळ, शौचालय, परिसर विकास, विद्युतीकरण आदींचा समावेश असून आतापर्यंत 8 कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

Advertisement
Advertisement

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- या आगारावर आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. विशेष करून शौचालयाची सुविधा देऊन परिसर स्वच्छ ठेवला जावा. या परिसरात एक चांगल्या फूड कोर्टची व्यवस्थाही करण्यात आली पाहिजे.

लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमताने झालेले काम निश्चितपणे चांगलेच होते, असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले- कोराडी जगदंबा देवी मंदिर परिसर आणि राज्यस्तराचे पर्यटन स्थळ होार आहे. येथे बसची संख्या वाढवण्याची सूचना त्यांनी मनपा परिवहन विभागाला केली. प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित 45 कोटींचे संस्कार केंद्रही जवळच्या परिसरात तयार होणार आहे. तसेच शिल्पग्राम या संकल्पनेवर आधारित एक प्रकल्पही येऊ घातल्याचे पालकमंत्री म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते आगारातील बससेवेचे उद्घाटनही करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement