Published On : Fri, Sep 20th, 2019

पालकमंत्र्यांच्या हस्ते भिलगावात 4.47 कोटींचे भूमिपूजन

नागपूर: कामठी रोडवरील शहराला लागूनच असलेल्या भिलगाव ग्रामपंचायती अंतर्गत व 190 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे 4 कोटी 47 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले.

सप्तगिरी लेआऊट भिलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अनिल निधान, रमेश चिकटे, कपिल गायधने, श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, कांचन कुथे, मोहन माकडे, निर्मलाताई पोटभरे, मंगलाताई कारेमोरे, शिवचरण शंभरकर, रवींद्र पारधी, सुनंदा भुराडे, बंडूजी कापसे, आदी उपस्थित होते.

नागरी सुविधा अंतर्गत वॉर्ड 1 मध्ये भूमिगत नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम 40 लक्ष ़रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजनमधून रामवाटिका ते हस्तीनापूर नाला पूर संरक्षण भिंत 99.61 लक्ष मंजूर करण्यात आले. वॉर्ड 2 मध्ये भूमिगत सिमेंट बांधकाम, सिमेंट रस्ता व भूमिगत नाली बांधकाम, रस्त्याचे खडीकरण पाच कामांसाठ़ी 50 लक्ष मंजूर करण्यात आले. याशिवाय राधाकृष्ण मंदिर सभागृह बांधकाम, हायमास्ट लाईट भिलसिटी, हायमास्ट लाईट ऋषिकेश टप्पा1, पाटीलनगर रस्ता डांबरीकरण या कामासाठी 23 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

वॉर्ड 3 मध्ये नागरी सुविधाअंतर्गत नाली बांधकाम, सिमेट रस्ता, रस्त्यांचे खडीकरण व बांधकाम 4 कामांसाठी 40 लक्ष मंजूर करण्यात आले. याशिवाय सिमेंट रोड बांधकाम, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, नाली बांधकाम या कामासाठी 49.45 लक्ष व 31 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. वॉर्ड क्रमांक. 4 मध्ये नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक लावणे या 4 कामासाठी 40 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.

तांडा वस्तीत रुक्मिणी मंदिर येथे यात्री निवास बांधकाम व सिमेंट रस्ता बांधकामासाठ़ी 15 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम, भूमिगत नाली, पेव्हर ब्लॉक या 4 कामांसाठी 40 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. तसेच अंगणवाडी बांधकामासाठी 8.50 लक्ष मंजूर करण्यात आले. भूमिपूजनानंतर लवकरच ही कामे सुरु होतील.