कामठी शहरात 80 कोटींच्या कामांचे भूमिपूजन विकासासाठी निधीची कमी नाही : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: कामठी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमी नसून हे शहर आदर्श आणि सुंदर बनवायचे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळाला पाहिजे हाच आपला उद्देश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कामठी शहरात नगर परिषदेतर्फे 80 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. याचवेळी पूर्ण झालेल्या काही कामांचे लोकार्पणही पालकमंत्र्यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रीय ÷अल्पसंख्य आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, नगराध्यक्ष शहजाद शफाअत, उपाध्यक्ष शाहिदा कलिम अन्सारी, उद्योजक अजय अग्रवाल, शहर भाजपाध्यक्ष विवेक मंगतानी, प्रा. मनीष वाजपेयी, बरिएमंचे जिल्हाध्यक्ष अजय कम, शहर अध्यक्ष दीपक गणवीर, नगरसेविका पिंकी वैद्य, छोटू मानवटकर, संध्या रायबोले, सुषमा सिलाम, लालसिंग यादव, स्नेहलता गजभिये, प्रतीक पडोळे, अफआज ठेकेदार, काशनाथ प्रधान, अ‍ॅड. आशिष वंजारी, डॉ.संदीप कश्यप, डॉ. महेश महाजन उपस्थित होते.

पालकमंत्री यावेळी म्हणाले- कामठी शहराला सर्वात सुंदर बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.चे मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी, संचालक अशोक झाडे यांनी तर आभार श्रीकांत शेंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.