Published On : Sat, Sep 25th, 2021

कोळश्याने भरलेल्या ट्रकच्या अपघातात वृद्ध ठार

Advertisement

– अक्षरशः संपूर्ण शरीर चेंदामेंदा,अन्नामोड परिसरातील घटना,ट्रकचालक पोलीसांच्या ताब्यात

खापरखेडा– भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या एका वेकोलीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा कोळश्याने भरलेल्या ट्रकच्या मागच्या चाकात अडकून पडल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील अण्णामोड परिसरात २५ सप्टेंबर शनिवारला सकाळच्या सुमारास घडली याप्रकरणी ट्रकचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले मात्र सदर घटनेमूळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा व वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आली आहे.

Advertisement
Advertisement

प्राप्त माहिती नुसार मृतकाचे नाव बिहारी ठगई राजभर वय ६० रा वार्ड क्रमांक ५ सिल्लेवाडा युको बँक जवळ असे असून ट्रक चालक आरोपीचे नाव सैय्यद फकरुद्दीन ज्यादा वय ५९ रा छिंदवाडा असे आहे.

मृतक बिहारी यांचे स्वतःच्या मालकीचे दोन घर सिल्लेवाडा व मिलनचौक परिसरात आहे याठिकाणी त्यांचे दोन मुले राहतात.

मृतक बिहारी घटनेच्या दिवशी २५ सप्टेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास भाजीपाला घेऊन सायकलने मिलनचौक येथील आपल्या घराकडे जात होते यादरम्यान अन्नामोड परिसरात टर्निंग पाइंटवर सायकलने आले असतांना विरुद्ध दिशेने येणारा कोळश्याने भरलेला ट्रक क्र. एमएच-३४-एव्ही-०९७४ डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात असताना ते ट्रकच्या मागच्या चाकात अडकून पडले सदर घटनेत घटनास्थळीच बिहारी यांचा मृत्यू झाला या भीषण अपघातात मृतक बिहारी यांचे संपूर्ण शरीर चेंदामेंदा झाले होते.

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली यावेळी शेकडो नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले ट्रक चालकासह ट्रक पोलीसांनी ताब्यात घेऊन ट्रक चालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement