
नागपूर – बहुप्रतिक्षित खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025 चे उद्घाटन शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होत आहे. सायंकाळी 6.30 वाजता होणा-या कार्यक्रमात आध्यात्मिक गुरू व श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.
कार्यकमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते मा. नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ‘चाणक्य’, ‘सम्राट पृथ्वीराज’ यासारख्या कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरांना घरोघर पोहोचवणारे लेखक व दिग्दर्शक पद्म डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचीदेखील उपस्थिती राहील. याशिवाय, सर्व आमदार कृष्णाजी खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, संदीप जोशी व अन्य माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक ‘हमारे राम’ याची प्रस्तुती होणार आहे. सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणा-या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी राहणार असून पुढचे बारा दिवस राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांनी केले आहे.
इतर स्थानिक कार्यक्रमांची मेजवानी
खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्य कार्यक्रमांच्या आधी रोज सायं. 6 ते 7 वाजेदरम्यान स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी ‘जेम्स बँड’ हा कार्यक्रम, 10 तारखेला फिंगर आर्टीस्ट, 12 तारखेला बासरी वादन, 14 तारखेला ट्रांसजेडर कलाकारांचा शो, 15 तारखेला बाल कला अकादमी, 16 तारखेला चाझ इटर्निटी हा कार्यक्रम होईल. 17 तारखेला शिववैभव किल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025
वेळापत्रक –
क्र. तारीख दिवस कलाकार
1 07-11-2025 शुक्रवार उद्घाटन – प.पू. गोविंद गिरी महाराज व पद्म श्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची उपस्थिती.
अभिनेते आशुतोष राणा यांचे ‘हमारे राम’ नाटक
2 08-11-2025 शनिवार विशाल मिश्रा – लाईव्ह इन कॉन्सर्ट
3 09-11-2025 रविवार फ्यूजन
4 10-11-2025 सोमवार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील ‘राष्ट्रसंतांची जीवनगाथा’ हा दृक श्राव्य संगीतमय कार्यक्रम
5 11-11-2025 मंगळवार महाराष्ट्राची हास्य जत्रा
6 12-11-2025 बुधवार अखिल सचदेवा – लाईव्ह इन कॉन्सर्ट
7 13-11-2025 गुरुवार संस्कारभारती ‘मिट्टी के रंग’ हा कार्यक्रम
8 14-11-2025 शुक्रवार रेखा भारद्वाज व विशाल भारद्वाज – लाईव्ह इन कॉन्सर्ट
9 15-11-2025 शनिवार कविसंमेलन
10 16-11-2025 रविवार श्रेया घोषाल – लाईव्ह इन कॉन्सर्ट
11 17-11-2025 सोमवार शंकर महादेवन – संघगीत
12 18-11-2025 मंगळवार अजय-अतुल – लाईव्ह इन कॉन्सर्ट
‘जागर भक्तीचा’ कार्यक्रम वेळापत्रक
सकाळी 7 ते 8.30
क्र. तारीख दिवस कार्यक्रम
1 08-11-2025 शनिवार श्रीमद् भगवत् गीता पठण
2 09-11-2025 रविवार श्रीराम रक्षा व मारुती स्तोत्र पठण
3 10-11-2025 सोमवार शिव महिमा स्तोत्र पठण
4 11-11-2025 मंगळवार श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र पठण
5 12-11-2025 बुधवार श्री हरिपाठ पठण
6 13-11-2025 गुरुवार श्री गजानन विजय ग्रंथ 21 वा अध्याय पठण
7 14-11-2025 शुक्रवार श्री विष्णू सहस्त्रनाम पठण
8 15-11-2025 शनिवार हनुमान चालिका व सुंदरकांड पठण
9 16-11-2025 रविवार परित्तदेशना (महा परित्राण पाठ)
10 17-11-2025 सोमवार श्री सुक्त पठण








