
नवी दिल्ली :भारतातील उद्योगजगतात अब्जाधीशांची कमी नाही, पण “दान” देण्याच्या बाबतीत मात्र काहींची उदारता खरंच प्रेरणादायी ठरते. नव्या अहवालानुसार, 2025 मध्ये देशातील श्रीमंत उद्योजकांनी मिळून तब्बल 10,380 कोटी रुपयांचे दान केले आहे. यात सर्वात पुढे आहेत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर, ज्यांनी सर्वांना मागे टाकत भारतातील ‘सर्वात दानशूर व्यक्ती’ हा मान पटकावला आहे.
शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने 2708 कोटी रुपयांचे दान दिले असून, ते सलग चौथ्यांदा या यादीत पहिल्या स्थानी आले आहेत. दररोज सरासरी 7.4 कोटी रुपयांचे दान देणारे नाडर यांची देणगी गेल्या वर्षाच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांचे हे योगदान प्रामुख्याने शिक्षण, कला आणि संस्कृतीच्या प्रोत्साहनासाठी दिले गेले आहे.
भारतातील टॉप 10 दानशूर उद्योजक (2025)-
1शिव नाडर आणि कुटुंब (एचसीएल टेक्नॉलॉजीज) – ₹2708 कोटी
शिक्षण, कला आणि संस्कृतीसाठी देणगी
2.मुकेश अंबानी आणि कुटुंब (रिलायन्स फाउंडेशन) – ₹626 कोटी
शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरणासाठी दान
3.बजाज कुटुंब – ₹446 कोटी
ग्रामीण भारतातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी योगदान
4.कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब (आदित्य बिर्ला ग्रुप) – ₹440 कोटी
शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात दान
5.गौतम अदानी आणि कुटुंब (अदानी फाउंडेशन) – ₹386 कोटी
कौशल्य विकास आणि आरोग्यसेवा प्रकल्पांसाठी देणगी
6.नंदन नीलेकणी – ₹365 कोटी
सार्वजनिक सेवांमध्ये नवोपक्रमासाठी दान
7.हिंदुजा कुटुंब (हिंदुजा फाउंडेशन) – ₹298 कोटी
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योगदान
8.रोहिणी नीलेकणी (एकस्टेप फाउंडेशन) – ₹204 कोटी
शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी देणगी
9.सुधीर आणि समीर मेहता (UNM फाउंडेशन) – ₹189 कोटी
ग्रामीण विकास आणि आरोग्य क्षेत्रासाठी योगदान
10.सायरस आणि आदर पूनावाला (विल्लू पूनावाला फाउंडेशन) – ₹173 कोटी शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या विस्तारासाठी दान
दरम्यान भारतातील या दानशूर उद्योगपतींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की संपत्तीचा खरा अर्थ फक्त वैभवात नाही, तर समाजासाठी दिलेल्या ‘योगदानात’ आहे.दानाची ही परंपरा भारताच्या संस्कृतीतील माणुसकी आणि संवेदनशीलतेची खरी ओळख आहे.










