Published On : Wed, Dec 18th, 2019

खादी ग्रामोद्योग आयोग, स्वयम फाउंडेशन तर्फे अंबर चरखा वाटप कार्यक्रम’

Advertisement

नागपुर : आदिवासी बांधव आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, तसेच स्वयंम फाऊंडेशन नागपूर यांचे वतीने मंगळवारी विश्वकर्मा नगर भागात ‘अंबर चरखा वाटप कार्यक्रम’ घेण्यात आला.

यामध्ये मानिनी आदिवासी महिला मंडळ, मानेवाडा रोडवरील आदिवासी कॉलनी येथील नागरिकांना चरख्याचे निःशुल्क वाटप करण्यात आले.

केंद्रीय मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दक्षिण नागपुरचे आमदार मोहन मते, खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक डॉ. चंदूराज कापसे, खादी मंडळाचे सचिव अ‍ॅड. अशोक बन्सोड , स्वयंम् फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौहान, प्रमुख मार्गदर्शक चारु दत्त बोकारे, राजेश पुरोहित आणि देवेंंद्र दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

खादी ग्रामोद्योगतर्फे आदिवासी बांधवांना चरख्यावर सूत कताईचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.