Published On : Wed, Dec 18th, 2019

भाजपचे 144 आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त

Advertisement

नागपूर : भाजप आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भाजपचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश (BJP MLA at RSS Smruti Bhavan) आहे.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील तब्बल 114 आमदार या वर्गाला उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासवर्गाला हजेरी लावत आहेत.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश आणि महानगर सरसंघचालक श्रीधरराव गाडगीळ भाजप आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, बबनराव लोणीकर यासारख्या आमदारांनी सकाळी लवकर उपस्थिती लावली. आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना आमदारांनी अभिवादन केलं.

Advertisement
Advertisement