नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाने केलेल्या प्रगतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता केएफडब्ल्यू (जर्मनी) च्या उच्च पदस्थ प्रतिनिधी मंडळाने आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली.या प्रतीनिधि मंडळाचे नेतृत्व प्रोफेसर डॉ. जोचींम नागेल संचालक मंडळ सदस्य आंतरराष्ट्रीय वित्त सहाय्यता यांच्या नेतृत्वात केएफडब्ल्यू अधिकाऱ्यांच्या समवेत जर्मनीच्या अनेक प्रतिष्टीत प्रसिद्धी माध्यमांचे सदस्य सहभागी झाले होते.
संपूर्ण दिवस चाललेल्या या दौऱ्यांच्या अंतर्गत केएफडब्ल्यू पथकाने सर्व प्रथम मेट्रोच्या मुख्यालयला भेट दिली. या ठिकाणी केएफडब्ल्यूच्या चमूला नागपूर मेट्रोच्या कार्याची प्रगती आणि प्रकल्पाची वैशिष्ट्ये त्याच बरोबर मल्टीमॉडेल इंटीग्रेशन व पर्यावरण अनुकूल घेतलेल्या पुढाकाराबद्दल मेट्रो हाऊस येथे सादरीकरण करण्यात आले आले. त्याच बरोबर मेट्रो हाऊस येथे लावण्यात आलेल्या सोलर पावर आणि मेट्रो रेल प्रकल्पामध्ये वापर होणाऱ्या सौर उर्जा तसेच ५डी-बीम प्रकल्पाची माहिती प्रदान करण्यात आली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि इतर अधिकाऱ्यांन सोबत झालेल्या बैठकीया या प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल सविस्तर चर्चा झाली.
झालेल्या कार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्याकरता या केएफडब्ल्यू शिष्ट मंडळाने मिहान डेपो,खापरी,एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन त्याच बरोबर झिरो माईल,सिताबर्डी इंटरचेंज आणि वर्धा मार्गावरील निर्माणाधीन डबल डेकर उड्डाणपूलाची पाहणी केली. संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर शिष्ट मंडळाने नागपूर मेट्रो प्रकल्पाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असल्याचे मान्य करत प्रकल्पाला यापुढे सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
केएफडब्ल्यू पथकासोबत आलेल्या जर्मनच्या पत्रकाराने देखील प्रकल्पाच्या प्रगती संबंधी गौरव उद्दगार काढले. या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान कॅरोलीन गैसनार (विभाग प्रमुख दक्षिण आशिया),निकोलाई ट्रस्ट (प्रमुख वित्त पुरवठा),रोमाना राईस (वित्त अधिकारी),चेरीस पोटिंग (उप प्रसिद्धी अधिकारी),मायकल हेल्बीग (प्रसिद्धी अधिकारी),क्रीस्टोप केसलर (संचालक, केएफडब्ल्यू कार्यालय नवी दिल्ली) ,स्वाती खन्ना (तज्ञ अर्बन मोबिलिटी),आद्रीया फेलटेस (वित्त अधिकारी),एफएझे,ई & झे,एआरडी या प्रतिष्टीत प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनीधी दौऱ्यात सहभागी झाले होते. व महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार,संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक (वित्त) श्री.एस.शिवमाथन,कार्यकारी संचालक(स्ट्रॅटेजिक प्लानिंग) श्री. रामनाथ सुब्रमण्यम,महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.