Published On : Fri, May 10th, 2019

केळवद – भिमालगोंडी मार्गावरून धावेल पहिली रेल्वे

नागपूर – छिंदवाडा ब्रॉडगेज दरम्यानचा महत्त्वपूर्ण टप्पा

नागपूर: भारतीय रेल्वेत नॅरोगेज एैवजी ब्राडगेज रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहेत. त्याचाचा एक भाग म्हणू दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील केळवद -भीमालगोंडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्या मार्गावरून शनिवार ११ मेपासून रेल्वेवाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास येताना दिसत आहे.

नागपूर – छिंदवाडा ब्रॉडगेज प्रकल्पातील महत्त्वाचे टप्पे पूर्णत्वास आले आहे. यापूर्वीच छिंदवाडा ते भंडारकुड या ३५ किमीच्या मार्गावर रेल्वेवाहतूक सुरू झाली. त्यानंतर इतवारी ते केळवद या ४८ किमी मार्गावरूनही प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. पुढच्या टप्प्यात केळवद ते भीमालगोंडी हा ४४ किमी ब्रॉडगेज मार्गाचेही काम आता पूर्ण झाले आहे. त्याची तपासणीसुद्धा पूर्ण झाली असून रेल्वे मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. शनिवारी या मार्गावरून पहिली रेल्वे धावेल. नागपूर – छिंदवाडा दरम्यान आता केवळ भंडारकुंड – भीमालगोंडी या सुमारे २२ किमीच्या मार्गाचेच काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण होताच नागपूरहून थेट छिंदवाडापर्यंत रेल्वेधावू शकणार आहे.
भीमालगोंडीपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने केळवदपर्यंत सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीचाही विस्तार करण्यात येत आहे. इतवारीहून सकाळी ७.४५ वाजता भीमालगांडीपर्यंत गाडी सोडली जाईल. ही गाडी १०.१५ वाजता भिमालगोंडी स्थानकावर पोहोल. हिच गाडी सकाळी ११.१५ वाजता परतिच्या प्रवासाला निघेल आणि आणि दुपारी १.३० वाजता इतवारी स्थानक गाठेल. इतवारी स्थानकावरून दुपारी २.३० वाजता केळवदपर्यंतच दुसरी फेरी सोडली जाईल. ही गाडी केळवद येथून दुपारी ४.३० वाजता परतिच्या प्रवासाला निघेल.