Published On : Fri, May 10th, 2019

कॅटरिंग कंपनीच्या मालकासह कर्मचायांना अटक

Advertisement

रेल्वे स्थानकावरील खळबळ जनक प्रकार, आरपीएफने केला भंडाफोड

Nagpur Railway station

नागपूर: भारतीय रेल्वेकडून अधिकृत विक्रेते नेमले आहेत. त्यांना नियोजित ठिकाणही नेमुन दिले आहे. मात्र, हे विक्रेते रेल्वेच्या डोळ्यात धुळफेक करीत नेमून दिलेल्या ठिकाणा एैवजी दुसºयाच फलाटावर खाद्य पदार्थांची (अवैध) विक्री करताना आढळले. या अवैध प्रकाराचा आरपीएफने भंडाफोड करीत मालकासह तीन कर्मचाºयांना अटक केली. ही कारवाई बुधवार-गुरूवारच्या मध्यरात्री नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
दिलीप सिंह भदोरीया हे अधिकृत विक्रेते आहेत. फलाट क्रमांक २/३ वर त्याचे आर.के.एम. कॅटरींग या नावाने स्टॉल आहे. रेल्वेच्या नवीन नियमानुसार स्टॉल विक्रेत्यांना फलाटावरही खाद्य पदार्थाची विक्री करता येते. यासाठी रेल्वे कडे नियमानुसार रक्कमही भरावी लागते. रक्कम भरल्यानंतर रेल्वे त्यांना स्टॉल व्यतिरीक्त खाद्य पदार्थ विक्रीसाठी फलाट देते. मात्र, रेल्वेच्या डोळ्यात धुळफेक करीत या कॅटरींगचे कर्मचारी फलाट क्रमांक एकवर चहा विक्री करताना आरपीएफला आढळले. हा अनाधिकृत प्रकार आरपीएफ ठाण्यातील सीसीटिव्ही नियंत्रण कक्षात कैद झाला.

गुरुवारच्या मध्यरात्री १२़२० वाजता फलाट क्रमांक एकवर ट्रेन क्रमांक १२६४३ निझामुद्दीन एक्सप्रेस आली असताना, सीसीटीव्ही कक्षात आरक़े़ एम़ कॅटरिंगचे विक्रेते संतोष सिंह, राहूल सिंह व दीपक शर्मा तेथे चहा विकताना दिसून आले़ विशेष म्हणजे, आरक़े़एम़ कॅटरिंगला फलाट क्रमांक दोन व तीनवर चहा विकण्याचा परवाना जारी करण्यात आला असताना, ते अवैधरित्या फलाट एकवर चहाची विक्री करत होते़ त्यांना अटक करण्यात आल्यानंतर चौकशित त्यांनी आरक़े़एम़ कॅटरिंगचे मालक दीलीप सिंह भदोरिया यांनी फलाट एकवर चहाची विक्री करण्याचे सांगितल्याचे निष्पन्न झाले़ त्याअनुषंगाने तीन कर्मचाºयांसह दिलीप सिंह भदोरीया यालाही अटक करण्यात आली. त्यांना रेल्वे न्यायालयापुढे हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्यांच्यावर प्रत्येकी दिड हजार रुपये दंड ठोठावला आहे़ ही कारवाई मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त भवानीशंकर नाथ यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.