Published On : Fri, May 11th, 2018

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा

Advertisement

Ravindra Devtale

नागपूर: पुढील महिन्यात पावसाळा सुरू होतोय. तत्पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने झोनस्तरावर काय-काय सोयी हव्यात याबाबतचा अहवाल तातडीने द्या आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश मनपाचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त राजू भिवगडे, महेश मोरोणे, सुभाष जयदेव, राजेश कराडे, प्रकाश वऱ्हाडे, कोठे उपस्थित होते.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील ज्या जुन्या इमारती आहेत, ज्या पडण्याच्या स्थितीत आहे अशा इमारत मालकांना नोटीस देण्यात याव्या, रस्त्यावरील खड्डे ज्यात पाणी साचू शकते असे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, नादुरुस्त पंप तातडीने दुरुस्त करा, शिक्षण विभागाने शाळा आणि वर्गखोल्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरेने उपलब्ध होतील, अशी व्यवस्था ठेवा असे निर्देश उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी दिले. ज्यांची घरे मोडकळीस आली आहे, मुसळधार पावसामुळे ज्या घरांना हानी होऊ शकते, अशी घरे नागरिकांनी तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, आणीबाणीच्या परिस्थितीत महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष, झोन कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. देवतळे यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement