Published On : Fri, May 11th, 2018

उद्धव ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर

Advertisement

नागपूर – आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. विदर्भातील पदाधिकारी, आमदार, खासदार आणि संपर्क प्रमुखांशी चर्चा आणि विदर्भात संघटन बांधणीसाठी या बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकित होण्याची शक्यता आहे.

याबाबत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहे. त्यानंतर साडेचार वाजता उद्धव ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याचे सेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले. याचवेळी उद्धव ठाकरे भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीबाबत सेनेची भुमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. शहरातील रविभवन येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. अकरा वाजता सुरु झालेल्या या बैठकित सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि खासदारांशी उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. त्यानंतर विदर्भातील अकराही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची आज बैठक आहे. या बैठकीला शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर यासंह विदर्भातील संपर्क प्रमुख उपस्थित आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली, त्यामुळे स्वतंत्र लढण्याच्या चाचपणीसाठी आणि विदर्भात संघटन बांधनीसाठी आजची ही बैठक महत्त्वाची आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने स्वतंत्र लढली होती, त्यावेळी विदर्भात शिवसेनेला अवघ्या ४ जागा मिळाल्या, युतीत असताना शिवसेनेचे विदर्भात ९-१० आमदार निवडून यायचे, गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून विदर्भात भाजपचे ४४ आमदार निवडणून आले होते.

विदर्भात शिवसेनेच्या या प्रदर्शनामुळे आता आगामी निवडणुकीच्या वर्ष-दीडवर्षा आधिपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. याच उद्देशाने आज ते नागपुरात आले आहेत. शिवसेनेच्या संघटनेला बळ मिळावे आणि पदाधिकाऱ्यांचे मनोगत कळावे, त्यासोबतच स्वतंत्र निवडणूक लढण्याबाबत विदर्भातील सेनेच्या दाधिकाऱ्यांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत.

Advertisement
Advertisement