Published On : Sat, Jan 18th, 2020

जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर केदार समर्थकांची वर्णी

अध्यक्षपदी रश्मी बर्वे व उपाध्यक्ष पदी मनोहर कुंभारे निर्वाचित

नुकत्याच झालेल्या नागपुर जिल्हापरिषद निवडणुकीत एक मंत्री म्हणून नाही तर एका सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे संपूर्ण जिल्हा पिंजून काढत पशुसवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस ची एकहाती सत्ता आणली. त्या नंतर अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाकरिता असलेल्या चढाओढीत केदार गटाचे रश्मी बर्वे व मनोहर कुंभारे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी वर्णी लागली. या मुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मंत्री सुनील केदार यांचे वर्चस्व सिद्ध झाले.

आपल्या आक्रमक व लढवय्या व्यूहरचनेत भाजपाचे जिल्ह्यात पानिपत केलेले सुनील केदार यांनी काँग्रेस ला सत्तेत बसविले.

याच बरोबर अनुसूचित जाती महिला सवर्गा करीता राखीव असलेल्या अध्यक्ष पदावर रश्मी बर्वे व उपाध्यक्ष पदावर मंत्री सुनील केदार यांचे विश्वासू मनोहर कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी मंत्री सुनील केदार यांनी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व निर्वाचित जिल्हापरिषद सदस्यांना सांगितले की आपण जनतेचे सेवक म्हणून निवडून आलो आहो. व सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ देण्याकरिता प्रयत्न करावे. जनतेच्या समस्येकरिता मी सदैव आपल्या सोबत असल्याचे आश्वासन मंत्री सुनील केदार यांनी दिले.

या वेळी प्रमुख रूपांने नागपूर जिल्हापरिषद निरीक्षक माणिकराव ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेस महासचिव किशोर गजभिये, सुनील रावत,आमदार राजू पारवे, नानाभाऊ गावंडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत, अनिल राय प्रामुख्याने उपस्थित होते