Published On : Tue, Jan 21st, 2020

के.डी.के. इंजिनिअरींग कॉलेज येथे मॉक ड्रील व ईव्हॅकेशन ड्रील संपन्न

Advertisement

नागपूर : केंद्रीय गृह मंत्रालय व महाराष्ट्र ‍ अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई यांच्या आदेशान्वये, राष्ट्रीय स्तरावर अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत फायर ॲण्ड ईव्हेंकेशन ड्रील सकाळी 11.00 वाजता के.डी.के. इंजिनिअरिंग कॉलेज नंदनवन नागपूर येथे मॉक ड्रील घेण्यात आली.

यावेळी कॉलेज मधील दुस-या माळयावर आग लागल्याने दृष्य दाखवून काही जखमींना अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी शिडी लावून जखमींना फायरमन लिफ्ट व्दारे सुरक्षीत स्थळी आणण्यात आले.

यावेळी मा. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांची मार्गदर्शनाखाली के.डी.के. इंजिनिअरींग कॉलेज, नंदनवन नागपूर येथे सकाळी 11.00 वाजता मा. सचिव श्री. राजेंद्र मुळक, प्राचार्य डॉ. डी.पी. सिंग, उप प्राचार्य डॉ. ए.एन. ब्रदर, डॉ. वासन वर्गीस, प्राध्यापक, सिव्हील इंजिनिअरिंग शाखा, एस.आर. साठवले, कोऑर्डीनेटर मॉक ड्रील व प्राध्यापक श्री. तुषार शेळके, राष्ट्रीय सेवा योजना शाखा यांच्या उपस्थितीत कॉलेजमध्ये धोक्याची घंटा वाजवून कॉलेज मधील 450 विदयार्थी व 25 ‍ शिक्षक यांना सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले. तसेच मॉक ड्रील दरम्यान कॉलेजमध्ये विदयार्थीनी आग विझविण्याचे प्रात्याक्षिक दिले.

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांनी उपस्थित विदयार्थी, शिक्षक यांना अग्निसुरक्षा अंतर्गत मार्गदर्शन केले.

याबाबत एक दिवस आधीच अग्निशमन सुरक्षाबाबत आगीचे प्रकार आग विझविणे इत्यादी तसेच आपातकालीन परिस्थीतीत बाहेर सुरक्षित स्थळी जाण्याबाबत कॉलेज विदयर्थांच्या वेगवेगळया टिम तयार करुन त्या टीमला अग्निशमन विभागाचे कार्य. सहा. स्थानाधिकारी श्री. केशव आर. कोठे व श्री. मोहन के. गुडधे, केंद्र अधिकारी, लकडगंज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचार टीमचे नेतृत्व कुमारी तेजस्वी वंजारी, फायर टीमचे श्री. अथर्व पाटील, बचाव टीमचे श्री. देवांशु गोतमारे, शोध चमूचे कु. कल्याणी खोडे तसेच प्राथमिक उपचार टीमचे प्रवण कुमार, ट्रान्सपोर्ट टीमचे एस. परतेकी, मीडीया टीमचे अंशु गजभिये व मॅनेजमेंट टीमचे उप प्राचार्य डॉ. वर्गीस सर यांना माहिती देवून त्यांच्याकडून कवायती घेण्यात आल्या. कवायती यशस्वी करण्याकरीता सक्करदरा स्थानकाचे स्थानाधिकारी श्री. सुनील एम. डोकारे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. केशव आर. कोठे, कार्य. सहा. स्थानाधिकारी तसेच सिव्हील स्थानकाचे श्री. एस.एम. डहाळकर, श्री. दीलीप चव्हाण, प्रमुख अ.विमोचक श्री. आत्माराम जाधव, श्री. भरत पावले, श्री. सुरेश मांगे, ड्रायव्हर व 4 ट्रेनिज तसेच नागपूर दुरदर्शन यांनी सुध्दा सहकार्य केले.