Published On : Sat, Mar 14th, 2020

पुण्यतिथीनिमित्त कविवर्य सुरेश भट यांना मनपातर्फे अभिवादन

नागपूर : ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ यासारख्या गीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या कविवर्य सुरेश भट यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त मनपातर्फे अभिवादन करण्यात आले.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातील त्यांच्या प्रतिमेला मनपातर्फे उपमहापौर मनीषा कोठे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राहुल गायकी, मो. जमील, निशांत टेंभुर्णे, परमानंद लोणारे यांच्यासह अन्य कर्मचारी वृंद उपस्थित होते.