Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 5th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे MSEDCL चे विद्युत शटडाऊन शनिवार ७ डिसेंबर रोजी

  नेहरू नगर, लकडगंज, आशीनगर व सतरंजीपुरा झोनचा संध्याकाळचा पाणीपुरवठा राहणार बाधित

  नागपूर: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विनंतीवरून नागपूर महानगरपालिकेने कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे ६ तासाच्न्ह्या विद्युत शटडाऊनला मंजुरी दिलेली आहे. हे शटडाऊन ७ डिसेंबर रोजी राहील.

  ७ डिसेंबर सकाळी १० वाजता सुरु होऊन हे शटडाऊन दुपारी ४ वाजता पुउर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या शटडाऊन दरम्यान (33KV लाईन आऊटेज) मराविमंकडून अनेक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

  या शटडाऊनमुळे नेहरू नगर व लकडगंज झोनचा पाणीपुरवठा पूर्णपणे तर सतरंजीपुरा झोन व आशीनगर झोनचा पाणीपुरवठा अंशत: बाधित राहील.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145