Published On : Fri, Feb 26th, 2021

कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून जिल्हयाचे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत कन्हान नदी संरक्षित करा.

Advertisement

ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान-पिपरीचे अध्यक्ष प्रकाश जाधव च्या नेतुत्वात शिष्टमंडळाचे मा जिल्हाधिका-याशी चर्चा करून निवेदन.

कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व क्षेत्राचे माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने मा. रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी, टास्क फोर्स सदस्य नागपुर जिल्हा हयाना निवेदन देत चर्चा करून नागपुर जिल्हयाची जिवनदाहीनी कन्हान नदीत नागरी घाण, सांडपाणी, उद्योगाचे दुषित पाणी व औष्णीक विज प्रकल्पाचे प्रदुषण, वेकोलि च्या खुल्या कोळसा खाणीचे दुषित पाणी सतत कुठलिही प्रकीया न करता सोडुन नदी प्रदुषित करित असल्याने कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदी संरक्षित करा. अन्यथा जल जन आंदोलनास सामोरे यावे. अशा इसारा सुध्दा देण्यात आला.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान-पिपरी नगरपरिषद नदी भागाच्या शेजारील खुल्या कोळसा खाणीतुन २४ तास सातत्याने प्रचंड दुषित पाणी रोज कन्हान नदी पात्रात सोडले जाते. न प कन्हान-पिपरी शहरातील लोकवस्तीची घाणीच्या गटारी व दुषित सांडपाणी दररोज सुरेश नगरचानाला, खण्डेवाल नाल्यातुन कोणतीच प्रकिया न करता नदी पात्रात अनेक वर्षा पासुन सोडल्या जाते व पेपर मिल सिहोरा गावचे सिहोरा नाल्याने कन्हान नदीत सोडीत आहे. संडासाची घाण व सांडपाणी, मटन, मच्छी मॉर्के टचे वेस्ट, मेलेले जनावरे आणि खुली कोळसा खदान चे दुषित पाणी पिपरी, सिहोरा या सर्व स्तरातुन सोडत असल्याने ही नदी प्रचंड प्रदुषित झाली आहे. असेच न प कामठी च्या एक लाख नागरी घाणीच्या गटारी, कत्त लखाण्यातील वेस्ट, दवाखान्यातील रूग्णाची घाण, संडासाची घाण, मटन, कोंबडी व मच्छी बाजाराची घाणही नाल्याने कन्हान नदी पात्रात बिनधास्तपणे सोडले जात आहे.

खापरखेडा पावर प्रोजेक्टचे सर्व प्रदुषण नदी पात्राला लागुन असल्याने नदी सरळ प्रदु षित होते आणि नागरी घाणीचे नालेही याच नदी पात्रा त सोडले आहे. नगरपरिषद सावनेर, खापा, मोहपा या सर्वाकडुन कोलार,पेंच नदी पात्र पुढे कन्हान नदी बिना संगमाने प्रवाहीत होते. हया सर्व क्षेत्रातील उद्योग धंद्या तील दुषित पाणी नदी पात्रातच सोडत असल्याने कन्हान नदी प्रचंड प्रदुषणाचा स्तर वाढल्याने ही नदी घाण वाहुन नेणारा जणु नालाच झाली आहे. नदीचे प्रावित्र्य धोक्यात आले आहे. नदीचे अस्तित्व शेवटची घटका मोजत आहे.

मनपा नागपुर क्षेत्रातुन पिवळी नदी, पोहरानदी, नागनदीतुन प्रचंड मोठया प्रमाणात नागरी घाण, गटारी, मेलेल्या जनावरासहीत कन्हान नदीतच प्रवाहीत करीत आहेत. याच शहरातील सर्व छोटे, मोठे उद्योगाचेही दुषित पाणी नागनदीने सोडल्या जाते. शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि मोठ्या दवाखान्यातील रूग्णाचे मल मुत्रही याच नदी पात्रात प्रवाहीत केल्या जाते.

बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा, विद्यालय, महाविद्यालये इतर प्रतिष्ठाने तसेच नागपुर शहरात दररोज बाजारपेठेत रोज येणा-यांची नागरी घाणही यात नदी पात्रात संम्मिलीत होते. मनपा नागपुर क्षेत्रातुन दररोज ७५० एमएलडी दुषित पाणी असुन फक्त ३५० एमएलडी पाण्यासाठी एसटी पी कार्यान्वित आहे. उर्वरित ४०० एमएलडी दुषित पाणी नागनदी व्दारे कन्हान नदी पात्रातच सोडले जात आहे. अश्या सर्व स्तरातुन जिवनदाहीनी कन्हान नदी आव्याक्या बाहेर प्रदुषित झाली आहे.

याच नदी पात्रा तुन शेकडो गावे पंपाने पाणी टाकीत घेऊन फक्त ब्लिचींग टाकुन मलमुत्राचे हेच पाणी नळाने जनतेला पुरवठा करण्याचे पाप सातत्याने करित आहे. जिल्हया त रूग्णाची प्रचंड संख्या वाढुन, आकस्मिक मुत्युचे प्रमाणही वाढले आहे. कँन्सरचे भयावह रूग्णाचे आक डे चिंताजनक रूप धारण करून आहे. हे दुर्देवी विदार क समाजातील वास्तव्य सामोर आहे.

नागपुर जिल्हयातील सर्वच कोळसा खाणीतील दुषित पाणी नाल्यातुन नदीत प्रवाहित करण्याचे धाड स WCL कसे करते. जमिनीखालील आजुबाजुच्या २० ते २५ कि मी परिसरातील पाणी पाण्याच्या स्तरा च्या खाली उत्खनन होत असल्याने कोळसा खाणीत प्रचंड पाणी जमा होते. हे सर्व पाणी आमच्या हक्काचे आहे . पाण्याचे मुल्यमापन कसे केले जाते. पाण्याची विल्लेवाट पर्यावरण कायद्याच्या चौकटीत व्हावे. लावा रीस पध्दतीने नाल्यातुन नदी प्रदुषित करण्यात येते.

खापरखेडा औष्णीक वीज प्रकल्पाचे प्रदुषण, मौदा व नदी परिसरातील उद्योग धंदे ही नदी प्रदुषित करण्याचे पाप करित आहे. कोल्हार, बिनासंगम, कन्हान व मौदा या नदी पात्रात मोठया प्रमाणात अंतिम संस्कार, राख विसर्जन, श्री गणेश व देवी मुर्ती विसर्जन अश्या अनेक विधी संस्कार, पारंपारिक रिती या सर्वातुनही नदी प्रदु षणात वाढ झाली आहे.

हया संबंधात मा. हरित लवा दाने अनेक वेळा पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व नदी प्रदु षणास बंधने, प्रतिबंध घालुन कारवाईचे आदेश दिले आहे. नदी जमिनीखाली पाण्याचे स्त्रोत, वाहत्या पा ण्यात अडथळे आणि प्रदुषण अश्या सर्व कृत्यास प्रति बंध घालण्याचे व कारवाईचे आदेश देण्यात आले आहे . टास्क फोर्सने या विषयी कारवाईचे धोरणच जाहीर केले आहे. CPCB आणि MPCB या प्रशासनाने अनेक पत्रही आदेशीत केले आहे.

कन्हान नदी प्रदुषित होण्यास हीच व्यवस्था जवा बदार आहे. कोळसा उद्योग, कोराडी, खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्प व इतर उद्योगाने हवेतही प्रमाणा बाहेर प्रदुषण केले आहे. पाणी, हवा जमीन प्रदुषित झाले आहे. नागपुर जिल्हयातील नगरपरिषद कन्हान-पिपरी , कामठी, मौदा, मोहपा या सर्व मुख्याधिका-यांना व WCL चेअरमन आणि मनपा नागपुर आयुक्तानाही मा . हरित लवादाने दिलेल्या अनेक प्रकरणातील आदेश व मार्गदर्शन MPCB ने आदेशीत केले आहे. कृती न केल्यास फौजदारी कारवाईचे ही आदेशात आहे. वेळो वेळी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी होतच नाही ही शोकांतिका ? टास्क फोर्स ने ही आदेश निर्गमीत केले आहे. असे असतानाही हे व्यवस्थापन कुणाचेही ऐकतच नाही असेच दिसते. हे असाह्यय आहे.

यापुढे खपवुन घेतल्या जाणार नाही. कन्हान नदी ही नैसर्गि क पाण्याचे स्त्रोत असुन पिण्याच्या पाण्याचे प्रमुख साधन आहे. सर्वच गुंगे, बहिरे व आंधळ्याचे सोंग घेऊ न आहे का ? आता फक्त एकच कन्हान नदी संरक्षीत करा. अन्यथा जल जन आंदोलनास सामोर यावे लागे ल. परिणामास जवाबदारी आपली राहील. “जल ही जिवन है” अशुध्द पाणी पुरवठा विरूध्द एक युध्दच !

याप्रसंगी MPCB चे अधिकारी, न प कन्हान- पिपरी, कामठी, खापा, मौदा, सावनेर व वेकोलि अधि कारी, कामठी उपक्षेत्र प्रबंधक प्रामुख्याने उपस्थित होत. मा. जिल्हाधिकारी ठाकरे साहेबांनी संबधित अधिका-यांना येत्या एक महिन्यात कन्हान नदी पात्रात दुषित पाणी सोडण्यास प्रतिबंध लावुन कन्हान नदी संरक्षित करण्याचे आस्वस्त केले.

यावेळी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकडे, गणेश भोंगाडे, प्रविण गोडे, निलेश गाढवे, राजेश तुमसरे, प्रविण जुमळे, ऋृषभ बावनकर, केतन भिवगडे उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement