Published On : Tue, Jun 26th, 2018

हरदोली ते पंढरपुर पायदळ वारीचे कन्हान ला जल्लोषात स्वागत

Advertisement

कन्हान : – मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातील हरदोली गाव ते पंढरपुर ला निघालेल्या वारकरी पायदळ वारीचे श्री संताजी स्मृती सभागृह कांद्री-कन्हान येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले .

” जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ” च्या गर्जरात मध्य प्रदेशातील हरदोली गाव (ढाणा तिरोडी) ता कंटगी जिल्हा बालाघाट येथुन पंढरपुर करिता वारकरी भजन मंडळीची पायदळ वारी निघालेली आहे .

Advertisement
Advertisement

ही पायदळ वारी कांद्री-कन्हान नगरीत येताच श्री संताजी स्मृती सभागृहात ह.भ.प. हिरालाल ठाकरे , श्रीराम ठाकरे , ओमप्रकाश मेश्राम, बंडु राऊते, अर्जुन भोंडे आणि वारकरी भजन मंडळीचे तेली समाज कन्हान, कांद्रीच्या वतीने शरद डोणेकर उपाध्यक्ष जि.प.नागपुर,अशोक हिंगणकर, वामन देशमुख, मनोहरराव कोल्हे , मनोहर मदनकर, एस व्ही कँटर्स, बंडु गिरडकर, सुरेश अंबागडे, पतिराम देशमुख, नरेश शेळके , सोनु कापसे आणि पदाधिकारी , सदस्य व नगरवासीया व्दारे जल्लोषात स्वागत करण्यात आले . रात्री जेवण व मुक्काम करून सकाळी पंढरपुर कडे वारकरी पायदळ वारीचे प्रस्थान करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement